केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली नियुक्ती
कल्याण दि.16 ऑक्टोबर :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून कल्याण जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष पदांपाठोपाठ युवा मोर्चाची कार्यकारिणीही जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम युवा मोर्चा अध्यक्षपदी सौरभ गणात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सौरभ गणात्रा यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील, सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आणि पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ गणात्रा यांनी व्यक्त केली.