
कल्याण दि.1 मार्च :
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारविरोधात कल्याण जिल्हा भाजपतर्फे आज निदर्शने करण्यात आली. महिलांवर अनन्वयित अत्याचार करणाऱ्या शहाजाहा शेखला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे कल्याण पश्चिमेतील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने केली गेली.
पश्चिम बंगालमध्ये शहाजहा शेखच्या महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येऊनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्याला पाठीशी घालत असल्याचे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले. तसेच या शेखला बॅनर्जी यांनी तातडीने अटक करून कडक कायदेशीर शासन करण्याची मागणी यावेळी भाजपतर्फे करण्यात आली.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून शाहनवाज शेखच्या फोटोला जोडेही मारण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.