Home ठळक बातम्या पदाधिकारी हल्ला प्रकरणी भाजपचे डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर लाक्षणिक उपोषण

पदाधिकारी हल्ला प्रकरणी भाजपचे डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर लाक्षणिक उपोषण

 

डोंबिवली दि.15 मार्च :
डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ आज भाजपने डोंबिवलीत पोलीस ठाण्याबाहेर लाक्षणिक उपोषण केले.

गेल्या महिन्यात भाजपचे सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी मनोज कटके यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. त्याला 15 दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हल्ला झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याची भेट घेतली होती. आणि या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र त्यांनतर या प्रकरणाचा तपास पुढे गेला नसल्याने आम्ही संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान भाजपने दिलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या परिसरात उपोषणाला बसण्यास परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला. त्यामूळे पोलीस ठाण्याबाहेर असणाऱ्या फुटपाथवर भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा