
कल्याण दि.25 एप्रिल :
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. या अतिरेकी हल्ल्याविरोधात जम्मू काश्मीरपासून थेट कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. कल्याणातही भाजपचे नवनियुक्त मंडल अध्यक्ष स्वप्निल काठे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सायंकाळी नवीन कल्याण परिसरात उग्र निदर्शने करण्यात आली. अतिरेक्यांच्या या भ्याड आणि घृणास्पद हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून जनतेतही या दहशतवादी कृत्याविरुद्ध तीव्र असंतोष आहे. (BJP Navin Kalyan Mandal also publicly condemns the heinous massacre by terrorists in Pahalgam, Kashmir.)
त्याविरोधात कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील साई चौकात आयोजित या निषेध आंदोलनात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले. तत्पूर्वी या सर्वांनी एकत्र येत अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पाडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहिली. त्याबाहेर या अतिरेकी कृत्याचा निषेध करण्यासह यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर हा देशाच्या एकात्मता आणि अखंडतेवर हल्ला असून देशाचे कणखर नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिरेक्यांचा नक्कीच आपल्या सर्वांच्या मनात असलेला बदला घेतील असा विश्वास यावेळी मंडल अध्यक्ष स्वप्निल काठे यांनी व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या मंगल वाघ (प्रदेश उपाध्यक्ष) प्रेमनाथ म्हात्रे (जिल्हा सरचिटणीस), अर्जुन भोईर (माजी नगरसेवक), अर्जुन म्हात्रे (माजी विधानसभा अध्यक्ष), रमेश गोरे (माजी नगरसेवक), अशोक पवार (जिल्हा उपाध्यक्ष), एकनाथ दळवी सर (ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव), प्रिती दीक्षित (जिल्हा महिला सरचिटणीस), भावना मनराजा (जिल्हा महिला सरचिटणीस), श्याम मिरकुटे, राजेश सिंग, भगवान म्हात्रे नीता देसले, साधना गायकर, रवि गायकर, तानाजी करपे मनीषा बाळसराफ, नितीन सकपाळ, सतीश त्रिपाठी, राजेश ठाणगे, कल्पेश जोशी, दिपेश ढोणे, स्वप्नील थोरात, पंढरीनाथ म्हात्रे, भावेश परमार, संजय कारभारी, गणेश कारभारी,नीलेश भंडारी, कमलाकर घोलप, निमीष अरोरा, जयश्री पाटील, मीना मुळे, मंगल टीकम, वैशाली परदेशी, पोर्णिमा मोरे, संगीता घोलप, गौरव देसाई, सुनील चव्हाण, सच्चिदानंद दुबे, भारती बुटाला, सागर भालेराव, शालिक भोईर, पवन कारभारी, मनोज खापरे, शिवाजी चव्हाण, नीलेश राजे, देवराज राऊळ, विनायक कारभारी, गणेश भोईर, अनिल वलडोरा,किरण भोसले, जितेंद्र ठाकूर, शत्रुघ्न भोईर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.