Home बातम्या कल्याणात भाजपतर्फे जल्लोषात शिवजयंती साजरी

कल्याणात भाजपतर्फे जल्लोषात शिवजयंती साजरी

 

कल्याण दि.22 मार्च :
तिथीनुसार असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली. कल्याण शहर भारतीय जनता पक्ष आणि सौरभ आणि विकी गणात्रा या बंधूंतर्फे कल्याण पश्चिमेत त्याचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण पश्चिमेतील गजानन महाराज नगर परिसरामध्ये अत्यंत धूम धडाक्यात हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त सकाळपासूनच याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे करण्यात आले होते. सुरुवातीला ढोल ताशा पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने वादन करत एक वेगळीच वातावरण निर्मिती केली. त्यानंतर मोहने येथील शिवप्रेमींनी सादर केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याची माहिती आयोजक सौरभ आणि विकी गणात्रा बंधूनी दिली.

या कार्यक्रमाला कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा