Home ठळक बातम्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजित डोंबिवलीतील बाईक रॅली उत्साहात संपन्न

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजित डोंबिवलीतील बाईक रॅली उत्साहात संपन्न

 

डोंबिवली 29 मार्च:
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने आज २९ मार्च रोजी सकाळी मोठ्या उत्साहात बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण केले. बाईकस्वारांनी घोषणांच्या जयघोषात आणि भगवे झेंडे फडकवत नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला. (Bike rally in Dombivli organized on the occasion of Hindu New Year Swagat Yatra concluded with enthusiasm)

श्री गणेश मंदिर, नेहरू रोड येथून या बाईक रॅलीला प्रारंभ झाला. यामध्ये गणेश नगर, रेतीबंदर रोड, नवीन विष्णूनगर पोलीस स्टेशन, आनंद नगर, सम्राट चौक, पंडित दीनदयाळ मार्ग, जोंधळे शाळा, स्टेशन रोड, नांदीवली, गिरनार चौक, मिलाप नगर, मानपाडा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंजुनाथ शाळा, ब्राह्मण सभा, फडके रोड अशा विविध मार्गांवरून ही रॅली पुढे जात श्री गणेश मंदिर येथे समारोप झाला.

या बाईक रॅलीत ७० ते ८० बाईकस्वारांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यामध्ये डोक्यावर भगवे फेटे परिधान करून महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. बाईकस्वारांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “गणपती बाप्पा मोरया”, “प्रभू रामचंद्र की जय” अशा जयघोषात संपूर्ण शहरात उत्साह निर्माण केला.

रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी गणपती मंदिर विश्वस्त, संयोजन समिती सदस्य आणि विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी झेंडा दाखवून रॅलीला शुभेच्छा दिल्या. बाईकस्वारांनी मार्गावरील नागरिकांना हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

या बाईक रॅलीमुळे संपूर्ण डोंबिवलीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा