Home ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून डोंबिवलीत राबवलेल्या सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून डोंबिवलीत राबवलेल्या सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद

 

डोंबिवली दि.3 ऑगस्ट :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. या सदस्य नोंदणी अभियानात हजारोनच्या संख्येने सदस्य नोंदणी अर्जांचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक यांच्यात फोटो लावण्यावरून दुपारी चांगलाच वाद झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवली शहरभर सभासद नोंदणीचे बॅनर लावत सर्वेश हॉल येथे सदस्य नोंदणी अभियान राबवले.

डोंबिवलीतील सर्वेश हॉल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सभासद नोंदणी सुरू करण्यात आली. या सभासद नोंदणीला शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. डोंबिवली शहर ग्रामीण परिसरात एकूण ३० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून येत्या 3 दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करू असा विश्वासही शिंदे समर्थकांनी व्यक्त केला.

यावेळ गोपाळ लांडगे, राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, राजेश कदम, विश्वनाथ राणे, रणजित जोशी, नितीन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे समर्थक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा