Home ठळक बातम्या दि.बा. पाटील यांच्या नावासाठी एकवटले स्थानिक भूमीपुत्र ; मानवी साखळी आंदोलनात हजारोंचा...

दि.बा. पाटील यांच्या नावासाठी एकवटले स्थानिक भूमीपुत्र ; मानवी साखळी आंदोलनात हजारोंचा सहभाग

 

कल्याण – डोंबिवली दि.10 जून :
नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मानवी साखळी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. तर मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही या आंदोलनात सहभागी होत या मागणीला आपला पाठींबा दर्शविला. Bhumiputra gathered for D.B.Patil’s name; Thousands participate in the human chain movement

नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्र चांगलेच आक्रमक झालेले पाहायला दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील हजारो भूमीपुत्रांनी रस्त्यावर उतरत शांततेच्या मार्गाने साखळी आंदोलन केले.

आज सकाळी 10 वाजल्यापासून कल्याण-शिळ मार्गावर, पिसवली ते शिळफाटा, कल्याण मलंगगड मार्गावर नेवाळी चौक ते तिसगाव चक्की नाका आणि (मुंब्रा -पनवेल मार्गावर) दहिसर ते शिळफाट्यापर्यंत ही मानवी साखळी उभारण्यात आली. तसेच जोपर्यंत नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिलं जात नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली.

आज झालेल्या या आंदोलनामध्ये संघर्ष समितीचे नेते गुलाब वझे, आमदार राजू पाटील, आमदार गणपत गायकवाड, स्मार्ट भूमीपुत्र संघटनेचे प्रशांत पावशे यांच्यासह अनेक भूमीपुत्र, महिला, वारकरी संप्रदायाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा