भिवंडी दि.15 फेब्रुवारी :
भिवंडी तालुक्यातील एका मराठमोळ्या शेतकरी उद्योजकाने आपल्या सर्वांचीच मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. ‘आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे’ या म्हणीला जनार्दन भोईर या मराठमोळ्या शेतकरी उद्योजकाने प्रत्यक्षात उतरवत पुन्हा एकदा भिवंडीचे नाव राष्ट्रीय पटलावर चर्चेत आणले आहे.
भिवंडी तालुक्यातील वडपे हे या मराठमोळ्या शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांचे गाव. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांचा दूध व्यवसायही आहे. त्याचजोडीला जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरत त्यांच्याकडे असणाऱ्या शेतजमिनीपैकी काही भागात गोदाम बांधले. तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. दूध व्यवसायासाठी त्यांना पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावे लागते. तर या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनाही त्यांच्याकडे यावे लागत असल्याने आपण हे हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
येत्या 15 मार्च रोजी हे हेलिकॉप्टर भोईर यांच्याकडे दाखल होणार असून आज त्यांच्या जागेची आणि इतर तांत्रिक मुद्द्यांची हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चाचपणी करण्यात आली. मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते. त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर,सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. आज गावात उतरलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये स्वतः न बसता भोईर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींना फेरफटका मारून आणला.
काही वर्षांपूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडलॅक ही आलिशान कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमानही भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर येथील अरुण आर पाटील या आगरी समाजातील उद्योजकांनी मिळवला आहे. त्यानंतर आता इथल्याच शेतकरी उद्योजकाने चक्क हेलिकॉप्टर खरेदी करत घेतलेल्या गगन भरारीचे सर्वत्र कौतुक आणि जोरदार चर्चा होत आहे.
Cialis Viagra Levitra online without prescription. Lowest Prices. Generic and brand cialis. online casino The best pharmacy shop on the.