Home ठळक बातम्या भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासह महायुतीचे आमदार किसन कथोरेंचा रेल्वे प्रवाशांबरोबर...

भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासह महायुतीचे आमदार किसन कथोरेंचा रेल्वे प्रवाशांबरोबर संवाद


बदलापूर, दि. 20 एप्रिल:

लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांबरोबर संवाद साधला. बदलापूर होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण झाले असून, एअरपोर्टच्या धर्तीवर सुविधांसाठी बदलापूर रेल्वे स्टेशनात कामे सुरू आहेत. तर भविष्यात तिसऱ्या, चौथ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर विशेष महिला आणि एसी लोकल सुरू केली जाईल असे आश्वासन यावेळी कपिल पाटील यांनी दिले. (bhiwandi-lok-sabha-mahayuti-candidate-kapil-patil-along-with-mla-kisan-kathore-interact-with-railway-passengers-in-badlapur)

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी आज एकत्रितपणे बदलापूर रेल्वे स्टेशनचा दौरा करून प्रवाशांबरोबर संवाद साधला. बदलापूर रेल्वे स्टेशनवर होम प्लॅटफॉर्मची अनेक वर्षांपासून मागणी होती. होम प्लॅटफॉर्मची मागणी पूर्ण केल्याचे समाधान वाटत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले. तर येत्या काळात बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये लिफ्ट, एक्सलेटर, दोन प्रशस्त पादचारी पूल, उपाहारगृह, स्वच्छतागृहे अशी कामे होत असून, रेल्वे स्टेशनचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास केला जात आहे. तर आगामी काळात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण-बदलापूर दरम्यान लोकलसेवेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित प्रवाशांना दिले.
दरम्यान यावेळी काही प्रवाशांनी बदलापूरच्या पश्चिम भागातील तिकीट खिडकी रात्री बंद असल्याची तक्रार केली. त्यावर यासंदर्भात रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे विनंती करणार असल्याचे कपिल पाटील यांनी प्रवाशांना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा