Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेत बँकेचे एटीएम आगीमध्ये भस्मसात

कल्याण पूर्वेत बँकेचे एटीएम आगीमध्ये भस्मसात

 

कल्याण दि.10 जानेवारी :
कल्याण पूर्वेत आज सकाळी आगीच्या घटनेने खळबळ उडवून दिली. येथील कैलाश नगर आंबेडकर चौकात असणाऱ्या बँकेच्या एटीएमला आग लागली. ही आग इतकी मोठी होती की अवघ्या काही मिनिटात हे संपुर्ण एटीएम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
ऍक्सीस बँकेचे हे एटीएम असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत संपूर्ण एटीएम जळून खाक झाले होते अशी माहिती स्थानिकांनी दिली.
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आणि एटीएममध्ये किती रोकड होती ? याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

 

2 कॉमेंट्स

  1. मी 14 ऑगस्ट 2021 ला संध्याकाळी 4.30 ते 5.00 च्या दरम्यान एम आय डी सी निवासी ज्ञान मंदिर मध्ये कोविडचा दुसरा डोस घेतला पण मला अजुन सर्टिफिकेट नाही आले आणि रजिस्टर झालेले पण नाही. मला काय करावे म्हणजे माझा दुसरा डोस चे सर्टिफिकेट मिळेल. कारण खुप अडचण होते. का तिसरा डोस घेऊन दुसऱ्याचे सर्टिफिकेट घ्यायचे खुप अडचणीत आहे काय करावे सुचत नाही. माझा मोबाईल न. 9320001975 आहे. कृपया मार्ग सुचवा.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा