उद्यापासून 13 मे पर्यंत लागू राहणार बंदी आदेश
ठाणे दि.14 मार्च :
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये 15 मार्च 2023 ते 13 मे 2023 पर्यंत संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी ही माहिती दिली आहे. (ban on tanker traffic in Dombivli-Ambernath-Badlapur MIDC during this time)
धोकादायक केमिकल सोडले जातेय नदीपात्रात
डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी मनाई आदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल वाहून नेवून नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास आणि नदीतील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.
सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी
या पार्श्वभूमीवर 15 मार्च ते 13 मे 2023 या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आल्याचे डीसीपी परोपकारी यांनी सांगितले.
उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई…
तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईही केली जाणार असल्याचेही ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी स्पष्ट केले आहे.