Home ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय दोरी उड्या (Jump Rope) स्पर्धेत कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी मिळवली १५ पदकं

आंतरराष्ट्रीय दोरी उड्या (Jump Rope) स्पर्धेत कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी मिळवली १५ पदकं

 

कल्याण दि.२३ नोव्हेंबर :
काही दिवसांपूर्वी थायलंडमधील बँकॉकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय दोरी उड्या दोरी उड्या (Jump Rope) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची अक्षरशः लयलूट केलेली पाहायला मिळाले. क्वीनस् कप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने एकूण २८ पदकं मिळवली असून त्यापैकी १५ पदकं ही कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी पटकावली आहेत.

सुप्रसिद्ध ॲथलिट आणि प्रशिक्षक अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली होती. या सर्वांनी आपली निवड सार्थ ठरवत देशासोबत कल्याण डोंबिवली शहरांचे नावही मोठे केले आहे. या स्पर्धेमध्ये १० देशांतील तब्बल ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील भूमिका नेमाडेने ३ सिल्व्हर + १ ब्राँझ, भार्गवी पाटीलने २ सिल्व्हर + १ ब्राँझ, तन्वी नेमाडेने १ सिल्व्हर + २ ब्राँझ, अंकिता महाजनने १ सिल्व्हर, ईशान पुथरनने २ ब्राँझ, श्रीया वाणीने १ ब्राँझ आणि पद्मक्षी मोकाशीने १अशी १५ पदकं पटकावली.

या स्पर्धेतील घवघवीत यशानंतर आता पुढील वर्षी जुलैमध्ये अमेरिकेत होणाऱ्या जागतिक स्पर्धेवर भारतीय संघाने लक्ष केंद्रीत केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा