कल्याण दि.3 नोव्हेंबर :
युवसेनेच्या कल्याण लोकसभा क्षेत्राच्या विस्तारकपदी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले – जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमूख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून नुकतीच ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून त्या कायम करण्यात येणार असल्याचेही युवासेना कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.