Home ठळक बातम्या संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती सदस्यपदी खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे...

संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती सदस्यपदी खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची नियुक्ती

भिवंडी दि.27 सप्टेंबर:
संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्य पदी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संसदेच्या वतीने गुरुवारी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी खासदार सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर झाल्याने भिवंडी लोकसभेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून सर्वच स्तरातून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

भिवंडी लोकसभेत नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असून आता संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याने सर्वप्रथम येथील नागरिकांना आवश्यक आणि योग्य त्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी आपण आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा