मुंबई दि.6 ऑक्टोबर :
शिवसेना पक्षाच्या “युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी” जितेन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीने जितेन पाटील यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जितेन पाटील यांना हे नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तर आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच त्यांनी दिलेल्या जबाबदारीला आणि आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला आपण पूर्णपणे न्याय देऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया जितेन पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान युवासेनेचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी उध्दव ठाकरे गटामध्ये केलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी युवासेना कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.