Home ठळक बातम्या २७ गावांतील अमृत योजना जलकुंभांच्या जागेचा प्रश्न सुटला – मनसे आमदार राजू...

२७ गावांतील अमृत योजना जलकुंभांच्या जागेचा प्रश्न सुटला – मनसे आमदार राजू पाटील यांची माहिती

 

लवकरच सुरु होणार जलकुंभांचे काम, अमृत योजनेच्या कामाला येणार गती

डोंबिवली दि.6 जानेवारी :
केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. गावागावात जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून यामध्ये जलकुंभांसाठी आवश्यक जागांचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून जलकुंभाच्या जागा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी केडीएमसीकडे हस्तांतरीत केल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या गावागावात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र २७ गावांमधील उसरघर, माणेरे, द्वारली, भोपर, देसलेपाडा, कोळे , संदप, निळजे, हेदुटणे या गावांमधील गुरुचरण, प्रांतिक सरकार इतर हक्क- परिवहन आयुक्त मुंबई यांचा आगाऊ ताबा, सार्वजनिक रस्ता, ग्रुप ग्रामपंचायत आणि प्रांतिक सरकार आदी प्रकारच्या जमिनींवर जलकुंभांचे आरक्षण होते. त्यामुळे या जमिनी जलकुंभासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे वर्ग करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जलवाहिन्या टाकल्या तरी जलकुंभांची कामे रखडली होती. २७ गावातील अमृत योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसेचा आमदार राजू पाटील यांनी सातत्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच जलकुंभांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांची पाहणीही आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत केली होती. जलकुंभांसाठी आवश्यक असणाऱ्या जागा तातडीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताब्यात मिळाव्यात यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे पाठपुरावा करत होते. अखेर या २७ गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलकुंभांसाठी जागा उपलब्ध झाल्याने जलकुंभांच्या कामांना आता गती येणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली.

गावागावात जाऊन ग्रामस्थांसोबत चर्चा करणे, अडचणी असल्यास त्या सोडवून अमृत योजनेचे काम हे सुरूच ठेवले होते. मात्र जोपर्यंत नागरिकांच्या घरात पाणी येत नाही, तोपर्यंत आपला पाठपुरावा सुरु ठेवून कल्याण डोंबिवली महापालिकेला अडचणी सोडवून देणार” असल्याचेही मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा