Home ठळक बातम्या केडीएमसीची आक्रमक भूमिका: नागरिकांनी मुदतीमध्ये मालमत्ता कर भरावा, अन्यथा कठोर कारवाई

केडीएमसीची आक्रमक भूमिका: नागरिकांनी मुदतीमध्ये मालमत्ता कर भरावा, अन्यथा कठोर कारवाई

1 डिसेंबरपासून शनिवार – रविवारसह सुट्टीच्या दिवशी कर भरणा केंद्र सुरू राहणार

कल्याण डोंबिवली दि.28 नोव्हेंबर :
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराची देयके वितरीत करण्यात आली असून नागरीकांनी मालमत्ता कराचा भरण वेळेत करावा. मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर महानगरपालिका कठोर कारवाईचा इशारा केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Aggressive stance of KDMC: Citizens should pay property tax before due date, otherwise strict action)

मालमत्ता कराची चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाही कराची रक्कम दि.३१ डिसेंबर, २०२४ पुर्वी भरल्यास ४% सवलत आणि ऑनलाईन २% सवलत देण्याचे यापुर्वी जाहिर केलेले आहे. तर ज्या नागरीकांनी अद्यापही मालमता कराची रक्कमेचा भरणा केलेला नाही अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येत आहेत.
नागरीकांनी मालमत्ता कराचा वेळेत भरणा न केल्यास थकीत करावर दर महिना २ टक्के दंडात्मक रकमेची कारवाई , नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्त करणे, अटकावणी करणे यासारखी कठोर कारवाई करण्यात येईल. या कारवाईनंतरही थकीत कराची वसुली न झाल्यास संबंधित मालमत्तांचा जाहिर लिलाव करुन त्याव्दारे ही करवसुली करण्याची तरतुद असल्याचे सांगत अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी नागरीकांनी ” मुदतीपुर्व मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी नागरीक हे नोकरदार – व्यावसायिक असल्याने त्यांना कार्यालयीन वेळेमध्ये मालमत्ता कराचा भरणा करणे सोईचे होण्यासाठी १ डिसेंबर २०२४ पासून सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये सर्व नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात येणार असल्याचेही केडीएमसीने स्पष्ट केले आहे.

मालमत्ता कराच्या बिलावरील QR-Code स्कॅन करुन तसेच महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावरुन मालमत्ता कराचा ऑनलाईन पध्दतीने भरणा करणेकरीता सुविधा उपलब्ध आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा