Home ठळक बातम्या ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा

ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा

 

कल्याण डोंबिवली दि.८ जुलै :
ठाण्यातील माजी नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला पाठींबा जाहीर केला. यामध्ये माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारीही असल्याची माहिती आहे. यामध्ये इतर पक्षातून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे.

ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ माजी  नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन काही तासही उलटले नसताना शिवसेनाचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील अनेक माजी नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दील्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच काही जण हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व माजी नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचेच सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व माजी नगरसेवक आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली.

दरम्यान यावेळी उपस्थित माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असून हा विकासरथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा