Home कोरोना कल्याणात मिलिंद चव्हाण विचार मंचातर्फे माफक दरात सुसज्ज कार्डिऍक ऍम्ब्युलन्स सुविधा

कल्याणात मिलिंद चव्हाण विचार मंचातर्फे माफक दरात सुसज्ज कार्डिऍक ऍम्ब्युलन्स सुविधा

 

कल्याण दि. 9 मे :
सध्याची कोवीड परिस्थिती आणि कोवीड रुग्णवाहिकेसाठी लोकांची होणारी परवड कमी करण्यासाठी कल्याणातील सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मिलिंद चव्हाण विचार मंच आणि चव्हाण प्रतिष्ठानतर्फे माफक दरात ‘कार्डिऍक ऍम्ब्युलन्स’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार कपिल पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत या कार्डिऍक ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. (Affordable Cardiac Ambulance Facility at Milind Chavan Vichar Mancha in Kalyan)

कोरोना आल्यापासून म्हणजेच गेल्या वर्षीपासून कल्याणातील प्रथितयश व्यवसायिक आणि सामाजिक जाणिव असणाऱ्या चव्हाण कुटुंबियांनी स्वतःला लोकांच्या मदतीसाठी झोकून घेतले आहे. कोरोनाचा लोकांवर गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक परिणाम झाला असून नागरिकांना रुग्णवाहिकांसाठीही अडचणी येत आहेत. चव्हाण प्रतिष्ठानच्या साहेबराव चव्हाण यांनी नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आणि सामाजिक गरज ओळखून माफक दरात कार्डिऍक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली. ज्यावर मिलिंद चव्हाण आणि सुनील चव्हाण या बंधूंनी अवघ्या काही दिवसांत आपल्या वडिलांची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. एका छोटेखानी कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार कपिल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्डिऍक ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण झाले.

तर कार्डिऍक ऍम्ब्युलन्ससाठी आवश्यक असणारी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, मॉनिटर, तज्ञ डॉक्टर अशी सुसज्ज सुविधा या गाडीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ना नफा आणि ना तोटा” या तत्वावरील माफक दरात ही कार्डिऍक ऍम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करण्यात आली असून कल्याण पश्चिमेतील नागरिकांनी त्याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन मिलिंद चव्हाण यांनी यावेळी केले.

यावेळी शिवसेनेचे रवी पाटील, जयवंत भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबा जोशी, चव्हाण प्रतिष्ठानचे सुनील चव्हाण, नंदकुमार देशमुख यांच्यासह गणेश हिरे, राजेश घाणेकर, अजय जगताप, प्रशांत वरगुडे, विनायक चव्हाण, विवेक भोसले, नितीन रोठेही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा