Home कोरोना कौतुकास्पद: कोरोनामुळे आलेली मानसिक मरगळ दूर करण्यास सरसावली शैक्षणिक संस्था

कौतुकास्पद: कोरोनामुळे आलेली मानसिक मरगळ दूर करण्यास सरसावली शैक्षणिक संस्था

 

कल्याण दि.22 मे :
कोरोना आणि लॉकडाऊन या दोन शब्दांनी गेल्या वर्षभरात आपल्या सर्वांना इतके ग्रासले आहे की त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी झगडता झगडता अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्ष दिड वर्षांपासून बहुतांश ठिकाणी नकारात्मक वातावरण असल्याने साहजिकच त्याचे प्रतिबिंब आपल्या मानसिक आरोग्यावरही उमटले आहे. मात्र लोकांना सकारात्मक ऊर्जा आणि दृष्टीकोन देण्यासह मानसिक बळ देण्यासाठी कल्याणातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘चांगल्या समाजासाठी आणि समाजाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी’ नेहमीच कार्यरत असणाऱ्या ‘पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशन’तर्फे ‘शिक्षणाच्या पलिकडे (Beyond Academics) नावाचा आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. (Admirable: Educational institute to alleviate mental illness caused by corona)

कोरोनानंतर अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. मग ती लहान मुले असो की मोठी माणसे. एकीकडे ढासळलेली अर्थव्यवस्था,पैशांची भासणारी कमतरता, नोकऱ्यांचे निर्माण झालेले प्रश्न आणि त्या जोडीला आरोग्याशी संबंधित समस्या. त्यामुळे या सर्वांचा सहाजिकच आपल्या मनावर परिणाम दिसून येत आहे. मात्र अशा सगळ्या विरोधाभासी वातावरणातही आपले मानसिक स्वास्थ्य कसे टिकवून ठेवायचे? त्याला कशाप्रकारे उभारी द्यायची किंवा आपले मानसिक बळ कसे वाढवायचे ? या सर्वांची एकाच ठिकाणी उत्तरं देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘शिक्षणाच्या पलिकडे’ हा कार्यक्रम.

आपलं आयुष्य कसं असावं हे बऱ्याच वेळा आपल्या हातात नसते. मात्र अशा नकारात्मक परिस्थितीत कसा प्रतिसाद द्यायचा हे आपण निश्चितच ठरवू शकतो. आणि हाच विचार आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडणार असल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती ऑनलाईनच्या माध्यमातून संवाद साधून लोकांमध्ये नवी ऊर्जा, चैतन्य आणि सर्वात महत्वाचे त्यांना मानिसक बळ देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हल्लीच्या काळात शिक्षण संस्था म्हणजे केवळ आर्थिक कमाईचेच साधन आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोटे ग्रुपने मात्र या प्रतिमेला छेद देत चांगला समाज घडवण्यासाठी आम्ही बांधील असल्याचेच या उपक्रमातून दाखवून दिले आहे.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क – 9967 444 566

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा