Home ठळक बातम्या “आदर्श” गोविंदा पथकाने फोडली शशिकला पोटे चॅरिटेबल ट्रस्टची कल्याणातील सर्वात मोठी दहीहंडी

“आदर्श” गोविंदा पथकाने फोडली शशिकला पोटे चॅरिटेबल ट्रस्टची कल्याणातील सर्वात मोठी दहीहंडी

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्याकडून आयोजन

कल्याण दि.28 ऑगस्ट :
दहीहंडी उत्सवानिमित्त कल्याणातील शशिकला पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्याकडून कल्याणमधील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी तब्बल 24 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याने गोविंदा पथकांनी ही दहीहंडी फोडण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र ही दहीहंडी फोडण्याचा मान “आदर्श गोविंदा पथक” यांनी मिळवला. आदर्श गोविंद पथक या विजेता ठरलेल्या पथकाला सचिन पोटे यांच्याकडून नियोजित बक्षीस देण्यात आले. (“Adarsh” Govinda team broke Sasikala Pote Charitable Trust’s biggest dahihandi in Kalyan)

या दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिला पथकाला देण्यात आल्याने महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता. दिवसभर अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाला शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेटी दिल्या. तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण असल्याने भर पावसातही प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात या दहीहंडी उत्सवाचे भव्य प्रमाणात यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. तर या दहीहंडी उत्सवाचा केवळ मनोरंजन हा उद्देश नसून महिला सुरक्षितता आणि जागृती हा मुख्य उद्देश होता अशी प्रतिक्रिया आयोजक सचिन पोटे यांनी यावेळी दिली.

दिवसभर चाललेला हा दहीहंडीचा थरार आणि गोविंदा पथकांचे प्रदर्शन वाखणयाजोगे होते. तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू लकी ड्रॉ च्या माध्यमातून देण्यात आल्या. उत्सवाबरोबरच सामाजिक भान जपणारी दहीहंडी सचिन पोटे यांनी आयोजित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा