Home ठळक बातम्या कल्याणात धावती डेक्कन क्विन पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशांचा अपघात

कल्याणात धावती डेक्कन क्विन पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशांचा अपघात

 

कल्याण दि.6 ऑक्टोबर :
धावत्या लोकल किंवा एक्स्प्रेसमध्ये चढू नका, उतरू नका असे आवाहन वारंवार होत असले तरी त्याकडे प्रवाशांकडून दुर्लक्ष होत असल्याचेच दिसत आहे. धावती एक्स्प्रेस पकडण्याच्या नादात पडल्याने 2-3 प्रवाशांचा अपघात झाल्याचा प्रकार कल्याण स्तेशनात घडला आहे. तसेच या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
डेक्कन क्विन कल्याण स्टेशनवर थांबत नाही. ही गाडी पकडण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा