Home ठळक बातम्या डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला अपघात; 5 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती

डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला अपघात; 5 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती

डोंबिवली दि.15 जुलै :
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या डोंबिवलीतील वारकऱ्यांच्या खासगी बसला मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ हा अपघात झाल्याचे समजते आहे. या बससमोर आलेल्या ट्रॅक्टरला ही बस धडकून अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ही बस खाली कलंडल्याने बसमधले प्रवाशी जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

फोटो आणि माहिती सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा