महाराष्ट्रासह गोवा राज्यातील 500 विद्यार्थ्यांची उपस्थिती
कल्याण दि.29 डिसेंबर :
अभाविप म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 57 व्या कोकण प्रदेश अधिवेशनाची कल्याणात आजपासून दणक्यात सुरुवात झाल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिमेच्या फडके मैदानावर सुरू असणाऱ्या या तीन दिवसीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यांचा गोवा राज्यामध्ये तब्बल 500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
एसएनडीटी विद्यापीठ कुलगुरू उज्वला चक्रदेव आणि राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान प्रमूख उपस्थितीत आज उद्घाटनाचे सत्र संपन्न झाले. कोकण प्रदेशातील सामाजिक, शैक्षणिक विषयावर या अधिवेशनात साधक बाधक चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच कोकण, महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सामाजिक सद्यस्थिती तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी असे विविध ठराव यामध्ये पारित केले जाणार असल्याची माहिती अभावी पचे कोकण मंत्री अमित ढोमसे यांनी दिली त्यासोबतच अधिवेशनात केल्या जाणाऱ्या काही मागण्यांची निवेदन हे राज्य सरकारलाही दिले जाणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.