डोंबिवली दि. ७ ऑगस्ट:
केंद्र सरकारच्या जीएसटी वाढीविरोधात डोंबिवली पश्चिम ह प्रभाग, संत ज्ञानेश्वर चौक येथे चौक सभा माध्यमातून आम आदी पार्टी डोंबिवली टीमतर्फे केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
एकीकडे देशातील बड्या उद्योगपतींची हजारो-लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जात असताना गोरगरीब जनतेला मात्र जीएसटी रूपी लुटणारा कर लावून उपासमारीच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याचे सांगत दुसरीकडे शासकीय सवलती, सुविधा काढून घेण्याचे पाप मायबाप सरकार-शासन करीत असल्याचा आरोप आप तर्फे करण्यात आला. अन्नधान्य, शालोपयोगी आणि इतर जिवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर काढून टाकून जनतेला दिलासा देण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने डोंबिवली ह प्रभाग वार्ड, संत ज्ञानेश्वर चौक येथे जनजागृती करण्यात आली आणि त्यासोबतच केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेधही यावेळी दर्शविण्यात आला.