Home Uncategorised “त्या” घटनेत अपंगत्व आलेल्या तरुणाला पुन्हा ऊभे राहण्यासाठी हवाय तुमचा मदतीचा हात

“त्या” घटनेत अपंगत्व आलेल्या तरुणाला पुन्हा ऊभे राहण्यासाठी हवाय तुमचा मदतीचा हात

कल्याण पूर्वेतील तरुणासोबत घडला हृदयद्रावक प्रकार

कल्याण दि.26 मे :
वय अवघे 31 वर्षे… तीनच महिन्यांपूर्वी झालेला विवाह… त्यात घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि अचानक एका दुर्घटनेत दोन्ही पाय गमावल्याने आलेले अपंगत्व. हा अतिशय हृदयद्रावक असा अनुभव, (मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या) नोकरीनिमीत्त कल्याण पूर्वेत स्थायिक झालेल्या जगन जंगलेवर आला आहे. या तरुणाला पुन्हा त्याच्या स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तुमच्या मदतीच्या हाताची नितांत गरज आहे.(A young man crippled by “that” incident needs your helping hand to get back on his feet)

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील एका गरीब शेतकरी कुटुंब. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जगन दादर पश्चिमेच्या मॅजेस्टिक बुक सेंटरमध्ये कामाला लागला होता. त्यासाठी कल्याण ते दादर आणि दादर ते कल्याण असा रोजचा प्रवास. तर अवघ्या 3 महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात त्याचा विवाह त्याने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र नियतीच्या मनामध्ये काही वेगळेच होते.

22 मे रोजी जगनने नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजता लोकलने दादर ते कल्याण असा आपल्या घरच्या प्रवासाला सुरुवात केली. ट्रेनला प्रचंड गर्दी असल्याने जगन लोकलच्या दरवाजातच उभा होता. ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने लोकल निघाल्यानंतर ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे अंतरावर ही लोकल अचानक स्लो झाली. त्याचदरम्यान काही टवाळखोरांनी चोरीच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने जगनच्या हातावर जोरदार फटका मारला. त्यामुळे जगन तोल जाऊन खाली पडला आणि त्याचे दोन्ही पाय लोकलखाली आले. त्यानंतर लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला आधी शासकीय आणि नंतर ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघाताचे गांभिर्य पाहता त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते.

सध्या त्याच्यावर ठाणे पश्चिमेच्या हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी त्याच्या दोन्ही पायावर शस्त्रक्रिया करून ते काढण्यात आले आहेत. जगनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता सध्याचा हॉस्पिटलचा खर्च हा त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच यापुढील उपचारांसाठीही जगनच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज भासणार आहे.

तरी आपण सर्वांनी आपल्याला जमेल तशी आणि जमेल तेवढी आर्थिक मदत करून जगनला त्याच्या पायावर पुन्हा ऊभे करू या. यासाठी तुमचा खारीचा वाटाही त्याच्या कुटुंबीयांसाठी मोठा हातभार लावेल.

बँक तपशील
Name- Mangesh Yashwant Jangale
Bank Name – State bank of india
Account no. 37297033737
IFSC – SBIN0012965

*गुगल पे क्रमांक*
मंगेश जंगले – 9768601156
तुषार जंगले -9653486856

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा