Home ठळक बातम्या नागपंचमी विशेष: नागाला जीवदान देत कल्याणच्या आधुनिक सुवासिनीने केली अनोखी पूजा

नागपंचमी विशेष: नागाला जीवदान देत कल्याणच्या आधुनिक सुवासिनीने केली अनोखी पूजा

 

कल्याण दि.21 ऑगस्ट :
आज नागपंचमी. सृष्टीचक्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या सर्पाची पूजा करण्याचा हा दिवस कल्याणकरांच्या दृष्टीने काहीसा वेगळा ठरला. आजच्या दिवशी सोसायटीत अचानक अवतरलेल्या नागदेवतेला जीवदान देत आधुनिक सुवासिनीने अनोखी पूजा केल्याचे दिसून आले.

नागपंचमीनिमित्त महिला वर्गाकडून नागाची किंवा त्याच्या वारुळाची प्रतिकात्मक पूजा केली जाते. मात्र कल्याण पश्चिमेतील नीळकंठ पार्क सोसायटीत आज पहिल्याच श्रावणी सोमवारच्या दिवशी सकाळी सकाळी चक्क नागोबाच प्रकट झाले.
श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी नागोबा आल्याचे कळताच भाविकांनीही त्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करत फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

त्याच सोसायटीत राहणाऱ्या सर्पमित्र सृष्टी सुहास पवार यांना या सापाबाबत माहिती समजली. त्यांनी लगेचच त्याठिकाणी धाव घेत या नागाला सुरक्षितरित्या पकडले. या नागाला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सृष्टी पवार यांनी सांगितले.

दरम्यान आजच्या पहिल्याच श्रावणी सोमवारी झालेल्या नागदेवतेच्या दर्शनाने सोसायटीतील श्रद्धाळूनी आनंद व्यक्त केला. तर या नागाला सुरक्षितरित्या पकडुन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याच्या भावनेने या आधुनिक सुवासिनीनेही समाधान व्यक्त केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा