कल्याण दि. 6 डिसेंबर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण पूर्वेमध्ये दादर येथील चैत्यभूमीची अत्यंत सुंदर अशी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि मी कल्याणकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कल्याण पूर्वेच्या गणेशवाडी येथील कॉमन मॅन चौकात माजी नगरसेवक आणि मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सांची स्तूपाचे प्रवेशद्वार, अशोकस्तंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह दादर येथील चैत्यभूमीची हुबेहूब प्रतिकृती याठिकाणी साकारण्यात आली आहे. दादरप्रमाणेच याठिकाणीही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आसपासच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी दाखल होत असल्याची माहिती नितीन निकम यांनी दिली.