Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात रोटरीच्या 115 प्रेसिडेंटच्या माध्यमातून खूप मोठं सामाजिक कामं – रोटरी...

ठाणे जिल्ह्यात रोटरीच्या 115 प्रेसिडेंटच्या माध्यमातून खूप मोठं सामाजिक कामं – रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे अध्यक्ष अरविंद शिंदे

 

कल्याण दि.26 एप्रिल :
जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी सामाजिक संस्था असलेल्या रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१४२ चे गव्हर्नर रो.दिनेशजी मेहता ह्यांनी आम्हा ११५ क्लब प्रेसिडेंट ह्यांना समाजासाठी भरीव काम करण्याची संधी दिली. आणि या सर्व रोटरी प्रेसिडेंटच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यात खूप मोठं सामाजिक काम उभे राहिल्याचे समाधान रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे अध्यक्ष रो.अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले. (A lot of social work done in Thane district through 115 Rotary Presidents – Arvind Shinde, President of Rotary Club of Kalyan Diamond)

कल्याण पश्चिमेच्या गांधीचौक येथील पंडितवाडी सभागृहात झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3142 च्या ऑफिशियल क्लब व्हिजीट कार्यक्रमात ते बोलत होते.

रोटरीमध्ये येऊन आपल्याला चार वर्षे झाली असून गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये आपल्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा आली. त्यावेळी आपण पूर्णपणे नवखे असताना आमचे असिस्टंट गव्हर्नर महेंद्र हिंगोराणी यांच्यासह प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्याने प्रत्येक कामामध्ये आपल्याला लहान भावाप्रमाणे मदत केली. या कालावधीत त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतानाच एक आधारही दिला अशी प्रांजळ भावनाही अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

तर रोटरीचे अध्यक्ष म्हणून गेल्या 10 महिन्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्य, विविध सामाजिक उपक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची शिंदे यांनी उपस्थितांना माहिती दिली. ज्यामध्ये अन्नपूर्णा दिवस, खडकपाडा चौकातील मजुरांना अन्न वाटप, क्लब मेंबर गिनिज बुक रेकॉर्ड, शालेय साहित्य वाटप, शौर्य वोकेशनल टुर, रक्षाबंधन, मंगळागौर, महिला सशक्तीकरण प्रदर्शन, सर्व्हायकल कॅन्सर कॅम्प, एपीएमसी मार्केटमध्ये आरोग्य शिबिर, माझा गणेशा, क्ले गणेशा, टीचर डे, हिंदी दिवस, कॉलेज स्टुडंट्ससाठी औद्योगिक भेट, मुरबाड तालुक्यातील शाळेत नक्षत्र गार्डन उपक्रम, भारतीय संविधान अमृत महोत्सव, मेंटल हेल्थ जनजागृती, रक्तदान शिबिरे , ड्रग एड्क्शन अवेअरनेस कार्यक्रम, वर्ल्ड टुरिझम डे, स्टडी ऍप वितरण, फेलोशिप दांडिया, कोजागिरी पौर्णिमा, वृद्ध व्यक्तींसोबत दिवाळी साजरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आरोग्य शिबिर, स्वयंसिद्धा महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर, भारतीय संविधान चर्चासत्र, कल्याण आयएमए मॅरेथॉनमध्ये सहभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी पतंग महोत्सव, गरजू विद्यार्थ्यांसाठी स्कूल किट – बॅग वितरण, आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानमाला, कल्याण आय टी आय कॅम्पमध्ये मेडीकल कॅम्प, करिअर मार्गदर्शन उपक्रम, महावितरणमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी सर्व्हायकल ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती आणि तपासणी, बेटी बचाव बेटी पढाव, जागतिक महिला दिन, पेडियाट्रिक हार्ट सर्जरीसाठी निधी संकलन कार्यक्रमामध्ये मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन गौरव पुरस्कार तसेच रोटरीचे ऑनररी सदस्यपद अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. तर पुढील दोन महिन्यांतही रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक – सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तर यावेळी उपस्थित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांनी रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडने आतापर्यंत केलेल्या भरीव सामाजिक उपक्रमांबद्दल अध्यक्ष अरविंद शिंदे,सचिव राजेश चासकर, खजिनदार राहुल पेंशनवार यांच्यासह संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्टचे डीएस निलेश लिखिते , हरिश्चंद्र भोईर , सीसी कीर्ती वडाळकर , जीडीएस डॉ. राजेंद्र वानखेडे , एजी जगदीश म्हात्रे , एएलएफ मंदार सोमण , फर्स्ट लेडी रो. संगीता शिंदे तसेच को प्रेसिडेंट योगेश कल्हापुरे , सिद्धेश देवळेकर , पराग कापसे , मनीष खंडागळे , बीजू उन्नतीन , किशोर मुळे व सर्व फर्स्ट लेडी आणि शहरातील विविध सामाजिक संस्था प्रमुख डॉ योगेश जोशी अक्षरमंच , फेल्सी फर्नांडिस लाभ फाउंडेशन, लता पालवे कल्याण महिला मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा