Home ठळक बातम्या दिग्गज कलाकारांच्या ‘दिवाळी पहाट’ला कल्याणकर रसिक श्रोत्यांचा तुफान प्रतिसाद

दिग्गज कलाकारांच्या ‘दिवाळी पहाट’ला कल्याणकर रसिक श्रोत्यांचा तुफान प्रतिसाद

भाजप आणि खासदार कपिल पाटील फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

कल्याण  दि. २४ ऑक्टोबर :

कोवीडमूळे दोन वर्षांच्या काल खंडानंतर झालेल्या कल्याण पश्चिमेतील ‘ दिवाळी पहाट ‘ कार्यक्रमाला कल्याणकर रसिक श्रोत्यांनी तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील फाउंडेशन आणि कल्याण शहर भाजपतर्फे या अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोवीडमुले गेली दोन वर्षे सर्वांनाच प्रचंड ताण तणावात काढावी लागली. मात्र यंदा दहीहंडी उत्सवापासून राज्य सरकारकडून सर्वच निर्बंध उठवल्याने नागरिकांमध्ये आनंद आणि उत्सुकता होती. दहिहंडीला रचल्या गेलेल्या निर्बंध मुक्तीच्या पायावर दिपावलीच्या उत्साहाने कळस चढवल्याचे दिसून आले.

भाजपा आणि कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे साई चौकात आयोजित केलेला हा कार्यक्रम तब्बल पाच तासांपर्यंत रंगला होता. पहाटे साडे पाच वाजता अत्यंत आल्हाददायक वातावरणात आणि रसिक श्रोत्यांच्या अलोट गर्दीत त्याचा प्रारंभ झाला. आघाडीचे गायक-गायिका अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, सावनी रविंद्र यांनी सादर केलेली एकाहून एक सरस अशी गीते, अभिनेत्री अमृता खानविलकरने आणि नृत्यांगना नेहा पेंडसे यांची मादक अदाकारी, हास्य कलाकार प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, गौरव मोरे, श्याम राजपूत आणि चेतना भट यांच्या भन्नाट विनोदी स्किटने या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ज्यामध्ये तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनीही विविध गाण्यांवर ठेका धरल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर झालेल्या या दिवाळी पहाटला नागरिकांचा अपूर्व उत्साह आणि जोश पाहावयास मिळाला. तर अवधूत गुप्ते यांच्या एका गाण्यावर नाचण्याचा मोह केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजप नेत्यांना आवरता आला नसल्याचेही यावेळी दिसले.

या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, केडीएमसी आयुक्त महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, वरुण पाटील, विकी गणात्रा, सौरभ गणात्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील वर्षी देव दिवाळीला कल्याणमध्ये दीपोत्सव साजरा करणार 

कल्याणची सांस्कृतिक परंपरा वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी देवदिवाळीला दिपोत्सव साजरा केला जाईल. त्याचबरोबर दिवाळीसंध्या कार्यक्रमही सुरू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या कार्यक्रमात केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा