Home ठळक बातम्या डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळावा; अनेक तरुण-तरुणींना मिळाला रोजगार

डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळावा; अनेक तरुण-तरुणींना मिळाला रोजगार

डोंबिवली दि.11 ऑगस्ट :
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, आज डोंबिवली पूर्वेकडील होरायझन सभागृहात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुमारे 5,000 तरुणांनी सहभाग घेतला. तर 130 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळविण्याची संधी मिळाली.(A grand employment fair held on behalf of Shiv Sena in Dombivli)

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र, डोंबिवली विधानसभा क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासन आणि शिवसेना शाखेच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. नुकत्याच परीक्षा झालेल्या असल्याने अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. या मेळाव्यात अशा तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असून, मेळाव्यात योग्य पात्रतेच्या उमेदवारांना ऑन-दि-स्पॉट नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे हा रोजगार मेळावा युवक-युवतींना त्यांच्या करिअरसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देणारा ठरला असल्याची भावना रोजगार मेळाव्याबाबत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, उपशहर प्रमुख संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, माजी नगरसेवक संजय पावशे आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा