संबंधित एजन्सीचे कॉन्ट्रॅक्टही संपल्याचे आले समोर
कल्याण दि.3 ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात पडलेल्या होर्डींगप्रकरणी अखेर केडीएमसीकडून संबंधित ॲड. एजन्सी आणि त्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा बॅनर लावणाऱ्या गुरू ॲड.एजन्सीविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या ॲड एजन्सीचे होर्डींगचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याचे आणि त्याचे नूतनीकरण न केल्याची धक्कादायक बाबही यातून उघड झाली आहे. (
कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील भलेमोठे होर्डींग काल सकाळी कोसळले. ज्यामध्ये 3 नागरिकांसह काही गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या मनसेने केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरत संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. ज्याला स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. अखेर लोकांच्या या दबावापुढे महापालिका प्रशासनाला झुकावे लागले आणि होर्डींग लावणाऱ्या संबंधित ॲड एजन्सीवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली.
हे धोकादायक होर्डींग लावणाऱ्या गुरू ॲड एजन्सीवर निष्काळजीपणा तसेच लोकांची सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.