टिटवाळा दि.14 जुलै :
विजेचा शॉक लागून एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना टिटवाळा येथील नांदप गावात घडली आहे. येथील शांताराम शेलार यांच्या मालकीची ही म्हैस असून शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
शेलार यांच्याकडे 15 म्हशी असून काल सकाळी या म्हशींना चरण्यासाठी ते नांदप – बनेली मार्गावरील गुरचरण भागात घेऊन गेले होते. त्यावेळी चरता चरता या म्हशीचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला. आणि लोखंडी खांबातून प्रवाहित झालेल्या विजेमुळे शॉक लागून आपल्या म्हशीचा मृत्यू झाल्याची माहिती शेलार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.
याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.