Home ठळक बातम्या अतिरेकी हल्ल्यातील त्या पिडीत कुटूंबांतील मुलांच्या शिक्षण- नोकरीसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत –...

अतिरेकी हल्ल्यातील त्या पिडीत कुटूंबांतील मुलांच्या शिक्षण- नोकरीसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Oplus_131072

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या डोंबिवलीमधील नागरिकांच्या कुटूंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

 

डोंबिवली दि.28 एप्रिल :

जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. (The government will provide all possible assistance for the education and employment of the children of the families affected by the terrorist attack – Deputy Chief Minister Eknath Shinde)

यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटूंबाना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगताना या पीडित कुटूंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगून त्याना याबाबत आशवस्त केले. यावेळी त्यांना धीर देताना या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल असेही सांगितले.

यावेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा