Home ठळक बातम्या श्रीनगर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीला धावली शिवसेना; खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी...

श्रीनगर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीला धावली शिवसेना; खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पर्यटकांशी संवाद साधून दिला धीर

महाराष्ट्रातील ६९ पर्यटकांची सुरक्षित प्रवासाची केली व्यवस्था

श्रीनगर दि.23 एप्रिल :

जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटकही आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर सर्वच पर्यटक मायभूमीत परतण्यासाठी आग्रही आहेत. या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर येथे आज सकाळीच पोहचली. त्यांनी सर्वांना धीर दिला. मानसिक आधाराने सर्वच पर्यटक सुखावले. (Shiv Sena came to the aid of tourists from Maharashtra stranded in Srinagar; MP Dr. Shrikant Shinde interacted with the tourists and gave them courage)

या पर्यटकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. यावेळी श्रीनगर येथे असलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ६९ पर्यटकांची परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. काही प्रवाशांचे नियोजित विमाने उशिराने असून त्यांना त्यापूर्वीच काश्मीर सोडायची इच्छा आहे. या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासापर्यंत त्यांची श्रीनगर येथील विविध हॉटेल मध्ये व्यवस्था झाली आहे. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाशी आणि सुरक्षा यंत्रणांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेचे देखील संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यामुळे सर्व पर्यटकांचा जीव भांड्यात पडला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देशाचे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी विमानाची सोय करण्याबाबत संवाद साधला होता. यावर तातडीने प्रतिसाद देऊन केंद्रीय मंत्रालयाकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. तर या संपूर्ण परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पर्यटकांना दिला धीर…

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्रीनगर येथील एका हॉटेल मध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी फोनद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांना सर्वांना धीर देत त्यांना लवकरच महाराष्ट्रात अगदी सुरक्षित रित्या परत आणण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी सर्व पर्यटकांना दिला. यावेळी सर्व पर्यटकांनी खासदार डॉ. शिंदे यांचे आभार ही मानले. तर दुसऱ्या हॉटेल मध्ये थांबलेल्या पर्यटकांशी खासदार डॉ.शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या माध्यमातून पर्यटकांना दिलासा दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा