
सचिवपदी डॉ. शुभांगी चिटणीस तर खजिनदारपदी डॉ. तन्वी शहा
कल्याण दि.21 एप्रिल :
कोवीडकाळात कल्याणकरांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराचे स्थान मिळवलेल्या इंडीयन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या नविन कार्यकारिणीने नुकताच पदभार स्विकारला. या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर यांची सर्वानुमते सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. तर संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी डॉ. शुभांगी चिटणीस, सहसचिवपदाची डॉ. राहुल तिवारी आणि खजिनदारपदाची जबाबदारी डॉ. तन्वी शहा यांनी स्वीकारली. तर पुढील वर्षीचे नियोजित अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र लावणकर यांच्या नावाची घोषणा केली गेली.
कल्याण पश्चिमेतील आयएमए कल्याणच्या सुसज्ज ऑडिटोरियममध्ये कल्याण डोंबिवलीचे नविन आयुक्त अभिनव गोयल, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ नरेश चंद्र या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. ज्याला कल्याण शहरातील विविध नामांकित सामाजिक संस्थांचे प्रमूख पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
आय एम ए कल्याणच्या प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसोबतच संस्थेचे ट्रस्टी, व्यवस्थापन कार्यकारिणी, स्टेट कौन्सिल, सेंट्रल कौन्सिलच्या सदस्यांची नावेही यावेळी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये ट्रस्टी म्हणून डॉ. नरेंद्र पाठक, डॉ. प्रदीप कुमार सांगळे, डॉ. राजन माने, यांची, व्यवस्थापन समितीमध्ये डॉ.अमित धर्माधिकारी, डॉ. दीप्ती दीक्षित, डॉ.विद्या ठाकूर, डॉ. गिरीश बिरूड, डॉ. अभिजित सिंग, डॉ. प्रकाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
तर स्टेट कौन्सिलसाठी कल्याण आयएमएचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. संजय गोडबोले, डॉ. विवेक भोसले, डॉ. प्रशांत खताले, डॉ. मनोज वर्मा, डॉ. स्मिता महाजन यांची आणि सेंट्रल कौन्सिलसाठी डॉ. प्रदीप कुमार सांगळे,डॉ. अश्विन कक्कर, डॉ. प्रविण भुजबळ, डॉ. स्नेहलता कुरीस या वरिष्ठ सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
गेल्या वर्षाच्या कार्यकाळात आपण समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असून यापुढील कार्यकाळातही आपण आणि इतर सर्व सदस्य त्याच दिशेने वाटचाल करू असा विश्वास अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी यावेळी व्यक्त केला.
तर केडीएमसीचे नविन आयुक्त अभिनव गोयल यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देतानाच लोकांमध्ये वेगाने पसरणाऱ्या कॅन्सर, मानसिक आरोग्य, दिव्यांग बांधवांसारख्या गंभीर मुद्द्यांवर कल्याण आयएमएने शासनासोबत सामूहिक स्तरावर एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली.