Home ठळक बातम्या महिला दिन विशेष : कर्तृत्ववान महिलांचा जायंटस् ग्रुपतर्फे मणीकर्णिका पुरस्कार देऊन गौरव

महिला दिन विशेष : कर्तृत्ववान महिलांचा जायंटस् ग्रुपतर्फे मणीकर्णिका पुरस्कार देऊन गौरव

 

कल्याण दि.24 मार्च :
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहेली आणि जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊनतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. येथील सुप्रसिद्ध बिर्ला महाविद्यालयाच्या ऑडीटोरीयममध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय अशा समाजातील विविध क्षेत्रामध्ये आजच्या घडीला अनेक महिला अत्युच्च दर्जाचे कार्य करीत आहेत. आपलं घर, कुटुंब आणि अनेक वैयक्तीक अडचणींवर मात करत या महिलांनी आज धडाडीने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. याचाच धागा पकडून जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहेली आणि जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊनतर्फे काल तिघा कर्तृत्ववान महिलांचा मणीकर्णिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्यामध्ये माजी नगरसेविका वीणा जाधव, सजग चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुजा लिमये आणि 49 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनर सोनल ठाकूर यांचा समावेश होता.

बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहेलीच्या अध्यक्षा उर्वशी गुप्ता सहेली आणि जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊनचे अध्यक्ष संजय गुप्ता, जायंटस् ग्रुपचे सेंट्रल कमिटी मेंबर मनोहर पालन, गगन जैन, सोलर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, जायंटस् ग्रुप फेडरेशन 1 सीचे अध्यक्ष डॉ. किशोर देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले.

जायंटस् ग्रुपच्या या मणीकर्णिका सन्मान सोहळ्याचे यंदा 12 वे वर्ष होते. गेल्या एका तपापासून हा महिला सन्मानाचा यज्ञ सुरू असून आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. ज्यांनी या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केल्याची भावना जायंटस् ग्रुप फेडरेशन 1 सीचे अध्यक्ष डॉ. किशोर देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.

तर सोलर मॅन म्हणून ओळखले जाणारे केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी महापालिकेच्या सर्व शाळा सौरउर्जेवर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची उपस्थितांना माहिती देऊन वीज बचतीचेहे आवाहन केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा