
यंदा जूनऐवजी मार्चमध्येच यादी आल्याने पालकांकडून समाधान व्यक्त
कल्याण डोंबिवली दि.22 मार्च :
कल्याण डोंबिवलीमध्ये राज्य शासनाच्या परवानगीशिवाय सुरु असलेल्या प्राथमिक शाळांची यादी केडीएमसी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी पालक वर्गाला केले आहे. तर एरव्ही जून महिन्यात जाहीर होणारी ही अनधिकृत शाळांची यादी केडीएमसी शिक्षण विभागाकडून तब्बल 3 महिने आधीच जारी झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. (KDMC announces list of 8 unauthorized primary schools; Education Department appeals not to take admission)
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित अनधिकृत शाळांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीही केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभाग उपआयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.
अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी …
१) एल.बी.एस. इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा – इंग्रजी माध्यम.
२) सनराईज स्कुल, बल्याणी टिटवाळा – इंग्रजी माध्यम.
३) संकल्प इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा – इंग्रजी माध्यम.
४) पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा – इंग्रजी माध्यम.
५) पोलारिस कॉन्व्हेन्ट स्कुल, बल्याणी टिटवाळा – इंग्रजी माध्यम.
६) डी.बी.एस. इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) – इंग्रजी माध्यम.
७) ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) – इंग्रजी माध्यम.
८) बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्र नगर, डोंबिवली (पश्चिम)- इंग्रजी माध्यम.