Home ठळक बातम्या १४ गावांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...

१४ गावांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि जिल्हापरिषद सीईओना आदेश

आमदार राजेश मोरे यांच्यासह विकास समितीने घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट

कल्याण ग्रामीण दि.12 मार्च :
नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांच्या विकासकामांबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि संघर्ष विकास समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. त्यावेळी १४ गावांच्या विकासनिधीबाबत सकारात्मकता दाखवित या गावांमधील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आणि जिल्हापरिषद सीईओना दिले आहेत. (Resolve pending issues of 14 villages immediately; Deputy Chief Minister Eknath Shinde orders Navi Mumbai Municipal Commissioner and Zilla Parishad CEO)

नवी मुंबईलगतची १४ गावे महापालिकेतून बाहेर काढण्याबाबत मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. मात्र या गावातील संघर्ष विकास समितीला ही गावे महापालिकेतच हवी असून याबाबत यापूर्वी देखील संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते, यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात ही गावे महापालिकेतच राहतील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी आज झालेल्या बैठकीत केली. त्याचबरोबर या गावाचे दप्तर आजच्या आज ताब्यात घेत आयुक्तांनी या गावात सुरु असलेल्या विकास कामाचा वेग वाढविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आयुक्त कैलास शिंदे यांना दिले.

त्यानंतर लगेचच आमदार राजेश मोरे ह्यांनी नवी मुंबई येथील आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह १४ गाव संघर्ष समितीला सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची भेट घेतली आणि १४ गावे नवी मुंबई महापालिकेत ठेवण्यासंदर्भात पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख भरत भोईर, गणेश जेपाल, लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, सुखदेव पाटील, भरत काळू भोईर, लक्ष्मण येदरकर, चेतन पाटील, काळूराम पाटील, महादेव जाधव, मनोज पाटील हे विकास समितीचे सदस्य उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा