Home ठळक बातम्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून इतर दिव्यांग बांधवांनाही मुख्य प्रवाहामध्ये आणणार – केडीएमसी आयुक्त डॉ....

सर्वेक्षणाच्या माध्यमातून इतर दिव्यांग बांधवांनाही मुख्य प्रवाहामध्ये आणणार – केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड

कल्याणात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित क्रीडास्पर्धेचे शानदार उद्घाटन

कल्याण डोंबिवली दि.1 मार्च :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे महापालिका क्षेतात दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्याद्वारे प्रवाहाबाहेर असणाऱ्या इतर दिव्यांगा बांधवांनाही प्रवाहामध्ये आणण्याचे काम केले जाईल असा विश्वास केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी व्यक्त केला आहे. केडीएमसीच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांग बांधवांच्या स्पर्धेस्थळी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांशी संवाद साधताना आयुक्तांनी ही माहिती दिली. (Through the survey, other disabled people will also be brought into the mainstream – KDMC Commissioner Dr. Indu Rani Jakhad)

केडीएमसी प्रशासनाकडून गेल्या वर्षभरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ज्यामध्ये दिव्यांग उपचार केंद्र हे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याठिकाणी दिव्यांग बांधवांच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टींचा विचार करून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर बऱ्याचदा आपल्यातील शारीरिक व्यंगाचे प्रमाण नेमके किती आहे याची योग्य माहिती नसल्याने अनेक जण या सोयी सुविधांपासून वंचित राहतात. त्यासाठी येत्या काळात महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्याद्वारे उर्वरित लोकांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असा ठाम विश्वास आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनीही यावेळी उपस्थित अंध दिव्यांग भगिनीशी बुद्धिबळ खेळण्याचा आनंद लुटला. या आणि या अंध भगिनीचे बुद्धिबळ खेळतील प्राविण्य पाहून तिच्यातील खेळाडूला त्यांनी तितकीच मनमुराद दादही दिली.

तर केडीएमसीच्या समाजकल्याण विभागातर्फे कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथील मैदानात दिव्यांग बांधवांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये बुद्धिबळ, कॅरम, गोळाफेक आदी क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्यासह माजी नगरसेवक मोहन उगले, उपआयुक्त संजय जाधव, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अशोक भोईर, समाज कल्याण अधिकारी प्रशांत गव्हाणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा