
कल्याण दि.25 फेब्रुवारी :
कल्याण पूर्वेच्या चाळीत आग लागून मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाल्याची घटना घडली. येथील गणेश नगरच्या तिसाई चाळीमध्ये शरद साहू यांच्या घराला ही भीषण आग लागली. कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पिडीत कुटुंबाला तातडीने आवश्यक ती मदत करत दिलासा दिला. (Chawl house caught fire: Urgent help to the victim’s family from MLA Sulabha Gaikwad)
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र या आगीमध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे साहू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच माननीय आमदार सौ. सुलभा गणपत गायकवाड यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच त्यांनी या कुटुंबाशी संवाद साधत धीर दिला आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. आमदार सुलभा गायकवाड यांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेमुळे संकटग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदारांचे आभार मानले आहेत.