
कल्याण डोंबिवली दि.24 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी 27 फेब्रुवारी 2025 रोजी 12 तास बंद राहणार आहे. केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीत राहाण्यासाठी विविध प्रकाराची तांत्रिक कामे केली जाणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ज्यामध्ये मोहिली उदंचन केंद्र येथे अत्यावश्यक तांत्रिक कामे करणे, डोंबिवली विभागातील नादुरूस्त व्हॉल्व बदलणे, कल्याण पुर्व आणि डोंबिवली विभागाच्या मुख्य जलवाहिन्यांची दुरूस्ती आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
ही कामे करण्यासाठी गुरुवार दि. २७/०२/२०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जाणाऱ्या संपुर्ण कल्याण पूर्व, कल्याण पश्चिमेचा काही भाग, संपुर्ण डोंबिवली पूर्व तसेच पश्चिम परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. (www.localnewnetwork.in)
तरी या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.