Home ठळक बातम्या अशीही समाजसेवा; दुर्धर आजारी व्यक्तीला भर रस्त्यात थांबून मदतीचा हात

अशीही समाजसेवा; दुर्धर आजारी व्यक्तीला भर रस्त्यात थांबून मदतीचा हात

आमदार राजेश मोरे यांची रूग्णाप्रती सहवेदना

कल्याण ग्रामीण दि.6 फेब्रुवारी :
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीला तत्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केलेल्या कृतीचे सगळ्यांकडून कौतुक केले जात आहे. मुंबईत मंत्रालयात बैठकीसाठी पोचण्याच्या गडबडीत असतानाही आमदार राजेश मोरे यांनी भर रस्त्यात गाडी थांबवून आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्याच करून दिल्या नाहीत, तर संबंधित विभागाशी संपर्क साधून या रुग्णाला आपल्यासोबत मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठीही घेऊन गेले. ( social service; Helping a sick person by stopping on the road)

आमदार राजेश मोरे गुरुवारी सकाळी एमआयडीसी डोंबिवलीतील बैठक आटोपून मुंबईत मंत्रालयात बैठकीसाठी निघाले होते. कल्याण शिळ मार्गावरून जात असताना अचानक उपतालुकाप्रमुख गजानन पाटील यांनी फोन करून एका व्यक्तीला आरोग्य विषयक मदतीची गरज असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती ऐकून घेताच हा रुग्ण असलेल्या परिसरातच आपण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आमदार मोरे यांनी पाटील यांना तत्काळ बोलावून घेत तो रुग्ण असलेल्या ठिकाणी स्वतःच दाखल झाले. आणि मुख्यमंत्री सहाय्य्य्ता निधीतून मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून देतानाच संबधित विभागातील व्यक्तीशीही संपर्क साधत या रुग्णाला तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. इतकेच नाही तर या रुग्णाला बरोबर घेऊन आमदार मोरे मुंबईच्या दिशेने मार्गस्थही झाले. आमदार राजेश मोरे यांनी या रुग्णाप्रती दाखवलेल्या या सहवेदनेबद्दल त्यांचे कौतुक तर होतेच आहे. मात्र त्यांचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी समाजसेवेच्या अंगिकरलेल्या व्रताप्रमाणेच आमदार राजेश मोरे यांनीही आपली पाऊलवाट स्वीकारल्याचेच या उदाहरणांमधून दिसून येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा