Home क्राइम वॉच कल्याणात 1250 बांग्लादेशी घुसखोरांचे अर्ज, दोन राजकीय व्यक्तींसह अतिरेकी संघटनांचा घुसखोरीला पाठींबा...

कल्याणात 1250 बांग्लादेशी घुसखोरांचे अर्ज, दोन राजकीय व्यक्तींसह अतिरेकी संघटनांचा घुसखोरीला पाठींबा – भाजप नेते किरीट सोमय्या

कल्याणातील बांग्लादेशी घुसखोरांबाबत घेतली तहसिलदारांची भेट

कल्याण दि.29 जानेवारी :
कल्याण तालुक्यामध्ये तब्बल 1 हजार 250 बांग्लादेशी रोहिंग्यांनी विविध कागदपत्रांसाठी अर्ज सादर केले असल्याचे सांगत राज्यात घुसखोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असून दोन राजकीय नेते आणि दोन अतिरेकी संघटनांचा त्याला पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यातील बांग्लादेशी रोहिंग्यांचा प्रश्न उचलत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कल्याण तहसिलदार सचिन शेजळ यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा गंभीर दावा केला. (Application of 1250 Bangladeshi infiltrators in Kalyan, extremist organizations including two politicians support infiltration – BJP leader Kirit Somaiya)

2 लाख बांग्लादेशी रोहिंग्याना भारतीय बनवण्याचे कारस्थान महाराष्ट्रात रचण्यात आले आहे. साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी त्याचे नियोजन करण्यात आले असून कल्याण तालुक्यात तब्बल 1 हजार 250 जणांचे अर्ज आल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली. या 2 लाखांपैकी 1 लाख 23 हजार जणांना भारतात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले असून 19 हजार जणांच्या अर्जाला मंजुरी मिळाली होती. मात्र या कट कारस्थानाचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली आहे. तर ज्याप्रमाणे पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी नेमला जातो, त्याच धर्तीवर जुन्या वर्षीचे जन्मप्रमाणपत्र व्हेरिफिकेशनसाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

तसेच या सर्व कारस्थानामागे मोठी गँग कार्यरत असून त्यामध्ये दोन राजकीय पुढारी, दोन अतिरेकी संघटनांचे नेते आणि दोन बांग्लादेशी एजंट या सहा जणांमार्फत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात राबवण्यात आल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

त्यासाठी मालेगाव एपीएमसीच्या नावाचा वापर करून 193 कोटी रुपये काढण्यात आले असून त्यातील 50 कोटी रुपये या घुसखोरांची कागदपत्र बनवण्यासाठी वापरण्यात आल्याची माहितीही सोमय्या यांनी यावेळी दिली. तर या सर्व प्रकरणाची चौकशी एटीएसकडून सुरू करण्यात येत असून प्रशासकीय सहभाग आढळल्याप्रकरणी मालेगावचे दोन तहसीलदार निलंबित करण्यात आले आहेत. आणि या सर्व तहसीलदारांना सगळ्या अर्जांची पूनर्तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून या 2 लाख घुसखोरांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार हेदेखील उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा