Home ठळक बातम्या कल्याण शहरातील विविध नागरी समस्या ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ...

कल्याण शहरातील विविध नागरी समस्या ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ केडीएमसी आयुक्तांच्या भेटीला

कल्याण दि.23 जानेवारी :
कल्याण शहरातील विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची भेट घेत लक्ष वेधले. पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छता, किल्ले दुर्गाडीशेजारील तबेला,अनधिकृत बांधकामे, प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. (Various civil problems of Kalyan city; Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party delegation meets KDMC Commissioner)

कल्याण पश्चिमेतील प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा उभारणे, लाल चौकी येथील बंद असणारी सिग्नल यंत्रणा सुरू करणे, अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था, रस्त्यावर असणारा झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांचा अभाव, स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक, तुटलेले फुटपाथ, कल्याण स्टेशन परिसरातील बजबजपुरी, अनधिकृत फेरीवाले, रिक्षांचे नियोजन, खडकपाडा येथील वाढलेले फेरीवाले, लालचौकी येथे मच्छी विकेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, शहरातील कचऱ्याचे संकलन, ट्रॅफिक वार्डन, मीरा हॉस्पिटलला रुग्णवाहिका जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे, रिंग रोडचे काम, अपुरी परिवहन व्यवस्था, अत्रे रंगमंदिरातील गाळेधारकांना देण्यात आलेली मालमत्ता कराची बिले या विविध प्रश्नांवर चर्चा करत तातडीने ते सोडवण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या विविध मागण्यांवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. तसेच यापैकी अधिकाधिक समस्या येत्या काळात सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी संपर्कप्रमुख साईनाथ तारे, उपजिल्हाप्रमुख विजय काटकर, उपशहरप्रमुख दिनेश शेटये, राजू दीक्षित, दत्ता खंडागळे, मारुती नांगरे, निलेश भोर, सतिश वायचळ, सुरज पातकर, शाखाप्रमुख कैलास भोईर, विश्रांत कांबळे, बाळा मसुरकर, प्रशांत धनवडे तसेच महिला पदाधिकारी सुवर्णा पवार, मीनल कांबळे, राजलक्ष्मी अंगारखे, वृंदा कांबळी, अक्षया दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा