Home ठळक बातम्या मॅरेथॉन बैठकीद्वारे आमदार रविंद्र चव्हाणांकडून डोंबिवलीतील विकास प्रकल्पांचा आढावा

मॅरेथॉन बैठकीद्वारे आमदार रविंद्र चव्हाणांकडून डोंबिवलीतील विकास प्रकल्पांचा आढावा

शहरातील विकासकामांना गती देण्याचे आमदार चव्हाण यांचे निर्देश

डोंबिवली दि.21 जानेवारी :
शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे काम कूर्मगतीने पुढे जात असल्याने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष, डोंबिवलीचे आ.रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची बैठक बोलावली होती. शहरातील पाणीटंचाई, फेरीवाले, अमृत, जलकुंभ उभारणी, स्व.शिवाजीशेठ शेलार मैदान, वेदपाठ शाळा, ठाकुर्लीच्या रहिवाश्यांसाठी प्रकल्प बधितांना पर्यायी घरांचे पत्र विकास आदी विविध विषयांवर चर्चा झाली. या विकासकामांना गती देण्याची सूचना आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांना करण्यासह संबंधित अधिकाऱ्यांनाही लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आदेश आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिले. (Review of development projects in Dombivli by MLA Ravindra Chavan through marathon meeting)

यावेळी डोंबिवली पश्चिमेतील जलकुंभ उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध असूनही पाईपलाईन शिफ्टींगचे अपूर्ण काम, पाणी वितरण व्यवस्थेचे संम्प पंपच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम, पूर्व – पश्चिमसाठी अमृत योजनेसाठी शासनाकडून मंजूर १६५ कोटी रुपये, सिव्हरेज टँक बांधकाम, पूर्वच्या पाथर्ली झोपडपट्टी येथील बीएसयूपी प्रकल्पात नागरी आरोग्य केंद्रासाठी आमदार निधी देणार, जोशी विद्यालय ते पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार म्हसोबा चौकापर्यंत करताना विस्थापितांना पर्यांयी घरे देण्यासाठी वाटप पत्र देणे, भगवान काटे नगरच्या रहिवाशांची निष्कासन प्रश्नावर पुनर्वसन कृतीआराखडा बनवून मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेणार, खंबाळपाडयाचे स्व. शिवाजी शेलार मैदान विकासासाठी खा. श्रीकांत शिंदे आणि आमदार रविंद्र चव्हाण यांची संयुक्त बैठक घेण्याबाबत, शिवमंदिर रोड येथे सुसज्ज वैकुंठ स्मशानभूमी बांधकामासाठी ६ कोटी निधी मंजूर, डोंबिवली पश्चिम सम्राट चौक ते रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन ते रामनगर परिसरातील फेरीवाले, शहराला जोडणाऱ्या रिंगरोडचे काम पूर्ण करणे, वेद पाठशाळा उभारणीसाठी 10 कोटींचा विकास आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी पाठवणे, पूर्व-पश्चिम येथील झोपडपट्टी येथे दलित वस्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर गलिच्छ वस्ती सुधार योजनेचा आराखडा शासनाकडे पाठवणे, तलाव कामांबाबतचा १५ कोटीमधून विकास, गणेश नगर जुनी डोंबिवली खाडी किनारी गणेश विसर्जन घाट आराखडे करून शासनाकडे पाठवणे आदी महत्त्वाच्या विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा