प्रदर्शनातील “ड्रोन शो” ने जिंकली सर्वांची मनं
कल्याण दि. 23 डिसेंबर :
सॅटेलाईट, रॉकेट, ड्रोन, रोबोटिक्सचे, सोलर एनर्जी, हायपर लूप, एआय या गोष्टी वाचून तुम्हाला वाटेल की आयआयटी किंवा इस्रोशी संबंधित या सर्व गोष्टींचा आणि इकडे काय संबंध ? मात्र आपल्या जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी सुप्रसिद्ध कल्याणातील केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल – ज्युनिअर कॉलेजमध्ये भरलेल्या सायन्स प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी या भविष्यातील विषयांचे सर्व प्रोजेक्ट सादर केले आहेत. या अनोख्या प्रदर्शनाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Satellite, rocket, drone, robotics lessons from students; A unique science exhibition was held at Cambria International, Kalyan)
भविष्यातील संधी ओळखून आवश्यक असणारे व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज बनली असून त्यादृष्टीने आपली उद्याची पिढी तयार होण्यासाठी केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजकडून या सायन्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे हे प्रदर्शनाचे सहावे वर्ष असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पाहून अचंबित व्हायला होतं. भविष्याचा वेध घेऊन या विद्यार्थ्यांनी सायन्स, टेक्नॉलॉजी, हेल्थ, शेती, रोबोटिक्स, सौर ऊर्जा, मॅगलेव्ह, प्लॅस्टिक रोड, होम ऑटोमेशन, एअर प्यूरीफिकेशन यासोबतच रॉकेट टेक्नॉलॉजी, एरोप्लेन, सॅटेलाईट, ड्रोन मेकिंग, हायपर लूप हे प्रकल्प सर्वांपेक्षा खास ठरले.
प्रदर्शनातील ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आणि ड्रोन शो ने जिंकली सर्वांची मनं…
या सायन्स प्रदर्शनामध्ये यंदा पहिल्यांदाच काही ॲडव्हेंचर गेम्स आणि ड्रोन शो चाही समावेश करण्यात आला होता. झिपलाईन आणि बर्मा ब्रीज या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतल्याचे दिसून आले. यानंतर सादर झालेल्या ड्रोन शोने उपस्थितांची मनं जिंकली. या प्रदर्शनातील एका ड्रोनद्वारे उपस्थितांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.
पाहा व्हिडिओ 👇👇👇
यंदाच्या प्रदर्शनात सादर प्रकल्पांपैकी काही प्रकल्प हे मुंबई आयआयटी फेस्टमध्येही सादर झाले होते अशी माहिती सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुप ऑफ एज्यूकेशनचे एमडी बिपिन पोटे यांनी दिली. तर शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत करणारेही काही प्रकल्प असून त्याचे पेटंट घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येणारे भविष्य हे रानीया म्हणजेच रोबोटिक्स, ऑटोमेशन, इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याभोवतीच फिरणार असून त्याच्याशी संबंधित सर्व प्रकल्प यामध्ये सादर केल्याचेही बिपिन पोटे यांनी सांगितले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाने मोठी मेहनत घेतली आहे.