Home ठळक बातम्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमान; कल्याण डोंबिवलीचा पारा थेट 12 अंशांवर, बदलापूरमध्ये 10

हंगामातील सर्वात निच्चांकी तापमान; कल्याण डोंबिवलीचा पारा थेट 12 अंशांवर, बदलापूरमध्ये 10

मुंबई उपनगरासह एमएमआर रिजनला हुडहुडी

कल्याण डोंबिवली दि.16 डिसेंबर :
आजपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीच्या किमान तापमानातही लक्षणीय नोंद झाली असून कल्याण डोंबिवलीचा पारा थेट 12-13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून यंदाच्या हंगामातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनला दिली आहे. तर बदलापूरमध्ये सर्वात कमी म्हणजे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (lowest temperature of the season; Mercury in Kalyan Dombivli at 12 degrees Celsius, 10 in Badlapur)

हवामान खात्याने आजपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचे तापमान कमी होण्यास सुरुवात झाली असून काही ठिकाणी पारा चांगलाच घसरला आहे. या घसरत्या वातावरणाचा परिणाम एमएमआर रिजनमध्येही जाणवू लागला असून आज बहुतांश ठिकाणी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

मात्र आपल्याकडे थंडीची लाट नसून इथले तापमान सामान्यापेक्षा 4 अंशांनी खाली घसरले आहे. तर केवळ पहाटेच्या सुमारास थंडीच्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी वर्तवली आहे. एकीकडे मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद जरी होत असली तरी दुपारच्या सुमारास मात्र एम एम आर रिजनमधील किमान तापमान तब्बल 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. हे दुपारचे तापमान सामान्य तापमानापेक्षा 2 ते 3 अंशांनी अधिक असल्याचेही मोडक यांनी सांगितले आहे. तर पुढील 2-3 दिवस असेच तापमान राहणार असून कमाल तापमान आणखी घसरण्याची आणि किमान तापमान असेच राहण्याची शक्यताही अभिजीत मोडक यांनी वर्तवली आहे.

दरम्यान एकीकडे सर्वात कमी तापमान झाल्याने हुडहुडी भरली असतानाच दुपारी मात्र तितकेच कडक उन्हाचे चटके असे काहीसे विरोधाभासी वातावरण एकाच दिवसांत पाहायला मिळणार आहे.

कल्याण डोंबिवलीसह एमएमआर रिजनचे तापमान…

कल्याण 12.8
डोंबिवली 13
बदलापूर 10.4
कर्जत 10.5
अंबरनाथ 11.5
ठाणे 14.5
पालघर 11.4
पनवेल 12.8
विरार 12.7
मुंबई 14
नवी मुंबई 13.6

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा