केडीएमसीने कल्याणात चांगले टेनिस कोर्ट बांधण्याची खेळाडूंची मागणी
कल्याण दि.9 डिसेंबर :
स्प्रिंगटाइम टेनिस क्लबने ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत कल्याणमध्ये प्रथमच ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. एकेरी आणि दुहेरी पद्धतीने स्प्रिंग टाईम क्लबमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये सर्वच वयोगटातील खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. (Goodnews: Spontaneous response to first ever open tennis tournament in Kalyan)
या स्पर्धेच्या दुहेरी सामन्यात डॉ. देवानंद धनवे आणि श्रेयस समेळ यांनी प्रतिस्पर्धी जयदीप हजारे आणि किरण काब्रा यांच्यावर ६-२ अशी मात करत प्रथम क्रमांक पटकावला. तर एकेरी सामन्यात वैभव सातारे यांनी विजय मिळवताना ६-४ अशा गुणांनी ओमकार भोईर यांना पराजित केले.
या स्पर्धेने कल्याणमधील टेनिसची वाढती क्रेझ अधोरेखित केली. कल्याणमधील बरेच नागरीक प्रेक्षक म्हणून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते. केडीएमसीने या खेळांची दखल घेत नागरिकांची ही आवड जोपासण्यासाठी शहरांमध्ये चांगले टेनिस कोर्ट तयार करण्याची मागणी यावेळी खेळाडूंकडून करण्यात आली.
या स्पर्धेच्या आयोजनाकरिता श्रेयस समेळ, किरण काब्रा, ॲड.जयदिप हजारे, तुषार पायगुडे, वैभव सातारे, कुलदिप मोरे, ओंकार भोईर, निलेश केणे, देवानंद धनवे आणि मोक्ष पायगुडे यांनी विशेष मेहनत घेतली.